धक्कादायक! सरकारी रुग्णालयात बॅटरीच्या उजेडात केली शस्त्रक्रिया पहा व्हिडिओ | Lokmat News

2021-09-13 0

ऑक्सिजनचा पुरवठा खंडीत झाल्याने काही महिन्यांपूर्वी उत्तरप्रदेशमधल्या १०० हून अधिक बालकांना आपला जीव गमवावा लागला होता, या घटनेनंतर येथील रुग्णालय प्रशासनाचा ढिसाळ कारभार समोर आला होता. या घटना ताज्या असताना नवाबगंज येथील सरकारी आरोग्य केंद्रातील आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. वीजपुरवठा खंडीत झाल्याने बॅटरीच्या प्रकाशात ३२ रुग्णांच्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मुख्य वैद्यकिय अधिकारी राजेंद्र प्रसाद यांनी शस्त्रक्रियेसाठी परवानगी दिली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.या भागात अनेकदा वीज पुरवठा खंडीत होतो. या परिसरात १२- १२ तास वीज नसते. ज्या दिवशी शस्त्रक्रिया करण्यात आल्या दिवशी संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास वीज पुरवठा खंडीत झाला होता, मंगळवारी सकाळी वीजपुरवठा पूर्ववत झाला

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires